लॉकडाऊन काळात कित्येकांचे आयुष्य झाले कायमचे ‘लॉक’

Foto
लॉकडाऊन काळात सर्वाधिक आत्महत्या 
जवळच्या माणसाशी संवाद साधणे हाच उपाय
मार्च महिन्यात कोरोनाने आपल्या आयुष्यात शिरकाव केला आणि त्यानंतर अनेकांच्या आयुष्याचे कालचक्र फिरले. दिग्गजांपासून सुरु झालेल्या आत्महत्यांची लाट सामान्यांपर्यंत येऊन पोहोचली.आणि या ’ लॉकडाऊन ’ च्या काळात कित्येकांनी आपल्या जीवनाचे दोर कायमचे कापले. ’ आयुष्यात आलेल्या मर्यादा, कोरोनाची भीती, आर्थिक अडचणी, कमी झालेले सामाजिकरण या कारणांमुळे लॉकडाउन काळात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे ’.जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त मनोविकार व मेंदू विकार तज्ञ डॉ. विक्रांत पाटणकर यांनी सांजवार्ताशी खास बातचीत केली. 
डॉ. पाटणकर यांनी सांगितले,’ मार्च नंतर ते आत्तापर्यंत जवळपास 30 ते 35 केसेस या कोरोनामुळे आलेल्या निराशेतून आत्महत्येच्या प्रयत्नांच्या होत्या.मनात आलेल्या नकारात्मक भावना कोणासोबतही शेअर केल्यास या गोष्टीला ब्रेक लागु शकतो,आणि हाच यावर एकमेव उपाय आहे. मात्र या भावना जर मनात दाबल्या तर त्या नंतर उफाळून येण्याची दाट शक्यता असते.याकाळात विशेषतः शेतकरी कुटुंबातील, मध्यमवर्गीय, कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी एकहाती असलेले,शिक्षणाच्या महत्वाच्या टप्प्यात असलेले अशा काही केसेस आल्या.यातील एक घटना त्यांनी यावेळी सांगितली.शहरातील उत्तम परिस्थिती असलेले एक व्यावसायिक. लॉकडाउनच्या आधी एका व्यवसायात त्यांनी पैसे गुंतवले नंतर ते पैसे बुडाले. कर्ज वाढले. ते सतत चिंतेत राहु लागले.
आत्महत्येची प्रक्रीया 
1) पॅसिव्ह स्टेज : आपल्या आयुष्यात काय चालंलय हे, देवाने मरण तरी द्यावे, सुटका करावी सगळ्यातून असे विचार येणे. 
2) अ‍ॅक्टिव्ह स्टेज : आता मला जगायचच नाही, मरण्याची इच्छा तीव्र होणे. दिवसातून 8 ते 10 वेळा सारखे तेच विचार येणे. 
3)टेन्टेटिव्ह अटेम्पटस  : हात कापून पाहणे, गळफास घेऊन पाहणे परत सोडणे असे विविध प्रयत्न करुन पाहिले जातात. मात्र अजूनही जगण्याची असलेली थोडी इच्छा, आपली माणसे डोळ्यासमोर येतात आणि व्यक्ती इथेच थांबतो. 
4) फायनल अटेम्पट : सगळ्या इच्छा, आशा संपून मृत्यूची इच्छा जीवनावर हावी होते आणि या स्टेजला शेवटी माणूस पक्‍का निर्णय करुन आत्महत्या करतो. जवळच्या व्यक्तीसोबत वेळीच बोलणे हा एकमेव उपाय या सर्व भावनांवर असल्याचे त्यांनी सांगितले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker